आता आपण प्राचीन लोकांना त्यांच्या स्वतःच्या पुराणकथांबद्दल असणाऱ्या कल्पना बघणार आहोत. ग्रीक लोक त्यांच्या पुराणकथांचे केवळ निष्क्रीय वाचक अथवा श्रोते नव्हते. त्यांना पुराणकथांबद्दल काही कल्पना होत्या आणि पुराणकथा म्हणजे काय हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपण पुराणकथेबद्दल असलेल्या प्राचीन कल्पनांपासून सुरुवात केली. समकालीन इंग्रजी शब्द 'मिथ' आणि अनेक रंजक अशा विरोधी कल्पना बघितल्या. या सर्वांचा पुराणकथा या संकल्पनेत सहभाग येतो. ही गोष्ट अजून परिपूर्ण होते जेव्हा आपण मागे वळून बघतो आणि प्राचीन लोकांना त्यांच्या स्वतःच्या पुराणकथांबद्दल असणारे विचार पाहतो. या चित्रफितीनंतर आपण पुढे जाऊन या गोष्टीकडे प्रबोधनयुग आणि नंतरचा काळ या दृष्टीकोनातून बघणार आहोत. पण इथे आपण प्राचीन काळातील लोकांनी त्यांच्या पुराणकथांबद्दल काय विचार केला हे पाहणार आहोत. आपल्याला लक्षात येईल की विचार एकसंध नाहीत, ते विविध आहेत आणि ते अनेक मुखांतून बोलल्या गेलेल्या आवाजांचे प्रतिनिधित्व करत आहेत. दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे पाश्चात्य परंपरेतील इसवी सन पूर्व ४२९ ते ३३७ या कालावधीत होऊन गेलेला महान तत्वज्ञ -प्लेटो. त्याला प्राचीन पुराणकथा आणि त्या पुनरावृत्त करणारे कवी यांबद्दल फार गुंतागुंतीची मते होती. ती स्वीकारायला अवघड होती कारण प्लेटो हा कवींचा मित्र नव्हता. त्यालुळे, पुराणकथा म्हणजे केवळ ऐकून मनोरंजन करणे किंवा त्रास करून घेणे नव्हे. त्या शक्तिशाली आहेत. त्या तुम्हांला तुम्ही खरोखर ज्या प्रकारचे आहात आणि ज्या प्रकारची तुमची मूल्ये आहेत तो आकार देतात. प्लेटोच्या मते, आपल्याला अजून एक कल्पना मिळाली आहे ती म्हणजे, पुराणकथांमध्ये संस्कृती निर्माण करण्याची शक्ती असते. पुराणकथांमध्ये संस्कृती निर्माण करण्याची शक्ती असते. मर्त्य माणसं असं विचार करतात की देव जन्माला येतात, त्यांना माणसांप्रमाणेच कपडे, वाणी आणि देह असतात. इथिओपियातील लोक म्हणतात की त्यांचे देव बसक्या नाकाचे आणि कृष्णवर्ण आहेत. थ्रासमधील लोक म्हणतात की देव निळ्या डोळ्यांचे असतात आणि त्यांना लाल केस असतात. आणि जर गाईगुरं, घोडे किंवा सिंहांना हात असते आणि ते चित्र काढू शकत असते तर घोड्यांनी त्यांच्या देवांचे आकार घोड्यांसारखे काढले असते, आणि गुरांनी गुरांसारखे. आपण आपल्या पुराणकथा आपल्या सांस्कृतिक मूल्यांधारे निर्माण करतो. लोक एकमेकांना ज्या प्रकारच्या पुराणकथा सांगतात त्यांना आकार देण्याचे महत्वाचे काम संस्कृती करते. आपण मध्ययुगातून पाहू. आणि आपल्या पुढच्या भागात आपण प्रबोधनकाळात आणि पुढे जेव्हा लोक या विचित्र, आश्चर्यकारक कथा समजून घायला बघतात तेव्हा काय होते ते पाहू.